Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

blocked by someone or blocking myself?

मला माझ्या मनाचे विचार करू दिले जातील? असा विचार जेव्हाही भेडसावतो  तेव्हा समोरच्याशी  संवाद करताना आपल्याला काहीतरी राहून गेल्याची भावना तीव्रतेने जाणवते.  या प्रकारच्या संवादामध्ये  नक्की राहून गेलेले असते? (१) मला माझे मन पुरेसे बोलून दाखविता येणे.  (२) समाधानकारक देवाणघेवाण झाली आहे अशी भावना. आणि या प्रकारच्या संवादामध्ये  नक्की काय मिळवून आपण बाहेर पडतो? (१) विरोध केला जातोय हे भावना. (२) माझे ऐकूनच घेतले जात नाही असे मत. म्हणजेज सामान पातळीवरील तो संवाद नव्हता. असे का घडते? दुसरे काय करतात यापेखा आपण काय विचार करतो, कसे ऐकतो, त्यावर कसा विचार करतो आणि मग कसे वागतो यावर विचार करणे आवश्यक आहे. आपल्याच मनातील विचार दुसऱ्या समोर मूर्त स्वरूपात आणताना ते विचार आपलेच स्वतःचेच आहेत का? याचा नीट विचार करायला पाहिजे.  आपले विचार मैत्रीच्या, जिव्हाळ्याच्या लोकांना, सहकारीच्या किंवा विश्वासाच्या लोकांना घेऊन मूर्त होतात. कसे? आपले विचार त्याच्यासोबत मांडून, त्यामध्ये सगळयांना सामील करून, सहभागी करून घेऊन, विचार मूर्त आणण्यासाठी...