मला माझ्या मनाचे विचार करू दिले जातील?
(१) मला माझे मन पुरेसे बोलून दाखविता येणे. (२) समाधानकारक देवाणघेवाण झाली आहे अशी भावना.
आणि या प्रकारच्या संवादामध्ये नक्की काय मिळवून आपण बाहेर पडतो?
(१) विरोध केला जातोय हे भावना. (२) माझे ऐकूनच घेतले जात नाही असे मत.
म्हणजेज सामान पातळीवरील तो संवाद नव्हता.
असे का घडते?
दुसरे काय करतात यापेखा आपण काय विचार करतो, कसे ऐकतो, त्यावर कसा विचार करतो आणि मग कसे वागतो यावर विचार करणे आवश्यक आहे.
अश्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार चटकन करता यायला हवा. नाहीतर आपला योग्य विचार अयोग्य लोकांबरोबर घडून निराशाजनक परिस्थिती येण्याची शक्यता असते. योग्य/अयोग्य हे नातेसंबंधातून ठरत नाही. कुवतीनुसार ठरते. संभाषण करताना कुवतीनुसार त्यात्या प्रकारच्या लोकांना निवडावे लागते. असे केले तर आपले विचार मांडले जाण्याची शक्यता असते.
असा विचार जेव्हाही भेडसावतो तेव्हा समोरच्याशी संवाद करताना आपल्याला काहीतरी राहून गेल्याची भावना तीव्रतेने जाणवते.
या प्रकारच्या संवादामध्ये नक्की राहून गेलेले असते?
(१) मला माझे मन पुरेसे बोलून दाखविता येणे. (२) समाधानकारक देवाणघेवाण झाली आहे अशी भावना.
आणि या प्रकारच्या संवादामध्ये नक्की काय मिळवून आपण बाहेर पडतो?
(१) विरोध केला जातोय हे भावना. (२) माझे ऐकूनच घेतले जात नाही असे मत.
म्हणजेज सामान पातळीवरील तो संवाद नव्हता.
असे का घडते?
दुसरे काय करतात यापेखा आपण काय विचार करतो, कसे ऐकतो, त्यावर कसा विचार करतो आणि मग कसे वागतो यावर विचार करणे आवश्यक आहे.
आपल्याच मनातील विचार दुसऱ्या समोर मूर्त स्वरूपात आणताना ते विचार आपलेच स्वतःचेच आहेत का? याचा नीट विचार करायला पाहिजे.
आपले विचार मैत्रीच्या, जिव्हाळ्याच्या लोकांना, सहकारीच्या किंवा विश्वासाच्या लोकांना घेऊन मूर्त होतात. कसे? आपले विचार त्याच्यासोबत मांडून, त्यामध्ये सगळयांना सामील करून, सहभागी करून घेऊन, विचार मूर्त आणण्यासाठी रूपरेखा (plan ) आखून.
याचाच अर्थ, विचार मूर्त आणणे ह्यासाठी सर्वस्वी स्वतःच जबाबदारी घेणे असा होय. पण मग यात काय विशेष? हे तर अपेक्षित आहेच ना?
येथे काहीतरी करावेसे वाटणे (wish/desire/expectation) आणि ते करणे (action) आणि आणि जे करावेसे वाटते तेच होणे (result) यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
शब्दांची उकल करूया.
करावेसे वाटणे आणि ते करणे यामध्ये येतो आपला जबाबदारी घेणारा/न घेणारा स्वभाव. यामुळे मित्र, सहकारी वगैरे आपल्या कामाच्या प्रयत्नांत सामील होतात, होऊ शकतात किंवा नाही देखील. कारण त्यांना आपण स्वतः पूर्णपणे सामील दिसतो, उत्साही दिसतो. त्यांना अशा कामात सहभागी होणे त्यांच्या स्वतःसाठी उपयोगी वाटते.
- पण आपल्याला मनातील विचार नक्की कोणत्या स्वरूपाचे आहेत, हे माहिती असले पाहिजे. wish/desire/expectation?
- आपण जिव्हाळ्याचे (मित्र, सहकारी, नातेवाईक वगैरे) लोक ओळखतो का? ते नेहमी माहितीतलेच लोक असतील असे आहे का?
- जवळचे (मित्र, सहकारी, नातेवाईक वगैरे) लोक जिव्हाळ्याचे नसतील/वाटत नसतील तर आपले स्वतःचे विचार साकार त्यांच्या बरोबर पूर्ण होण्याची शक्यता आहे का? असे होऊ शकते याची आपल्याला जाणीव आहे का? मान्य आहे का?
- यावेळी आपण आपल्या विचारात नवीन लोक आणण्यास त्यांच्यात जिव्हाळा तयार करणार आहोत आहोत का?
- पण आपल्याला मनातील विचार नक्की कोणत्या स्वरूपाचे आहेत, हे माहिती असले पाहिजे. wish/desire/expectation?
- आपण जिव्हाळ्याचे (मित्र, सहकारी, नातेवाईक वगैरे) लोक ओळखतो का? ते नेहमी माहितीतलेच लोक असतील असे आहे का?
- जवळचे (मित्र, सहकारी, नातेवाईक वगैरे) लोक जिव्हाळ्याचे नसतील/वाटत नसतील तर आपले स्वतःचे विचार साकार त्यांच्या बरोबर पूर्ण होण्याची शक्यता आहे का? असे होऊ शकते याची आपल्याला जाणीव आहे का? मान्य आहे का?
- यावेळी आपण आपल्या विचारात नवीन लोक आणण्यास त्यांच्यात जिव्हाळा तयार करणार आहोत आहोत का?
अश्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार चटकन करता यायला हवा. नाहीतर आपला योग्य विचार अयोग्य लोकांबरोबर घडून निराशाजनक परिस्थिती येण्याची शक्यता असते. योग्य/अयोग्य हे नातेसंबंधातून ठरत नाही. कुवतीनुसार ठरते. संभाषण करताना कुवतीनुसार त्यात्या प्रकारच्या लोकांना निवडावे लागते. असे केले तर आपले विचार मांडले जाण्याची शक्यता असते.
महत्वाचे म्हणजे, आपले विचार, आपल्याला साकार होण्यासाठी, आपले काम आणि त्याला आपणच जबाबदार. दुसरे नाहीत.
करावेसे वाटणे आणि ते होणे यात काम पूर्ण होण्याचा खूप महत्वाचा टप्पा.
या टप्यात येतात ते आपल्या चिकाटीत सहजपणे येणारे अडथळे?
आपल्याला करायचे काम आपण एकटे असतो तेव्हा सुचले असते का? कि दुसरे करताहेत म्हणून मलाही करावेसे वाटले?
आपल्या कामाचा महत्वाचा भाग दुसर्यांना देऊन टाकणारे आपण स्वताः आहोत का?
आपल्या उत्साहावर विरजण घालणारे सहकारी? त्या टीम मध्ये योग्य ते न बदल करणारे आपणच आहोत का?
माझ्या कामापेक्षा, माझे आप्तस्वकीय पुढाकार घेतात त्यामुळे मीही काहीतरी करायला पाहिजे असे मला वाटते आहे का?
आपल्या विचारांना क्षुल्लक समजणारे आपले आप्तस्वकीय. मदत न करणे आप्तस्वकीय? अविश्वनीय? अनाकलनीय? होय. असे होऊ शकते, असे नेहमीच होते. तुम्हाला ते माहित नव्हते एवढेच.
शेवटचा अडथळा तर सर्वात कठीण. दिसतो फक्त आपल्याला. कुणाला सांगण्याची सोय नाही आणि त्यावर मात करताना आपल्या प्रतिक्रिया आयुष्यभराच्या नात्यावर परिणाम आणेल असे मनावर ओझे आणतो आणि मग आपल्या प्रतिक्रिया बदलतो. त्या असतात रंगाच्या, हताश वाटाण्याच्या, अश्रूंच्या, मदत नसण्याच्या... एकूण स्वतःला आपल्याच आवडीच्या कामावरून लक्ष्य काढायला लावणाऱ्या.
आपण असे एकटेच. करू शकू? माझे आपलेच मदतीचा हात देत नाहीत, मित्रांना, सहकारी? त्यांना काय कळणार की माझा उत्साह कुठे ढकलला जातोय? आणि कशाने?
अशावेळी - आपल्याच शब्दांना तपासावे. मित्र - किती जवळचे? सगळे सारखे कि काही special? खास मित्रांना आपण विश्वसात कितपत घ्यावे? घ्यावे का?
जरूर.
आपले सहकारी, शेजारी - किती जवळचे? त्यांच्याशी आपले खरे संवाद होतात का? तेव्हाच आपण त्यांना आपल्या कामात भक्कम मदत करायला सांगू शकतो.
म्हणजेच, आपले विचार मूर्त करताना, होणाऱ्या विरोधावर मात करताना आपली टीम आपल्या योग्य आणि आपल्या पाठी भक्कम असलेली पाहिजे.
मात्र या गोष्टी, आपल्याला
त्याऐवजी आपण प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत, सोप्या आणि स्वतःला बळ देऊन, दुसऱ्याचा नाहक विरोध करणाऱ्या लुडबुडीला जाणीवपूर्वक बाजूला सारणाऱ्या.
आप्तस्वकीय जेव्हा आपल्या हिताच्या विरोधात काम करताना दिसतात तेव्हा आणिक जागरूक होऊन स्वतःच्या हक्काचे रक्षण केले पाहिजे. त्यानाच विरोध हा त्यांचा तुमच्याशी असलेल्या अवाजवी स्पर्धेतून असू शकतो. तो त्य्नाच्या स्वभावाची गरज असू शकतो. त्या विरोधाला उत्तर मिळते कॉन्फिडेन्सनं, काम पूर्ण करण्याने, नवीन लोक जोडण्याची, त्यांच्यात बिनदिक्कत वावर पाण्याने. थोडक्यात, आपल्या गोष्टी करण्याने..
ते करणे म्हणजे, स्वतंत्ररित्या आपले नाते, मित्र, समाजाचे, सहकाऱ्यांचे जाळे विणणे आणि आपलीच कामातून नवीन नाती जिंकणे...
याची सुरुवातच स्वतःचे विचार मूर्त करण्याने होते. आपण आपले स्वतःच्या वाढीचे जाळे विणतो. त्या जाळ्यात फक्त आपल्या अवधीचेच लोक असतात, असणार, असावेत.
विचार मूर्त करणे हे स्वतःवर घेतलेल्या जबाब्दारीचेच लक्षण होय...
विचार करा पण नंतर कामच करा, ते पूर्ण होईल याची काळजी घ्या. बघा विरोध कसा मोडीत काढला जातो ते. कोणत्याही जवळच्या नात्यामध्ये स्पर्धा असेल तर त्यावर उपाय एकाच. आपले विश्व निर्माण करणे, विसंबून ना राहणे, निर्णय स्वतः घेणे आर्थिक स्वातंत्र्य असणे. आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काम करू शकणे, स्वतःचे नात्यांचे जाळे विणता येणे.
Comments
Post a Comment