Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

Meaningful Existence Astitva

  का असतो  आपण मनाने एवढे असमाधानी, गोंधळलेले, असावध, भित्राट? का इतके दुःखी असतो? कशाची काळजी?  इतरांच्या विचारांना खरच मानतो आपण? देतो आवश्यक ते लक्ष? करतो सगळ त्यांच्या विचारांनी? का एवढे मदतीचे हात पाहिजे असतात? हात कसले मागतो आपण, काम करून हवे असते. मन संभाळून पाहिजे असते. दुःख सारवणारे शब्दच हवे असतात. खरं म्हणजे आतून जागं करून पाहिजे असतं. कोणीतरी येऊन दटावल, कानउघडणी केली, उकल करून दाखवली, पुढचा पाऊल घेण्याचा उत्साह भरला की मन सुरक्षित होत, प्रफुल्लित होत. निर्धास्त मार्गस्थ होतो मग आपण. अनेकदा हवा असतो असा विश्वास वाढविणारा पण निशब्द वावर. तर कधी आपल्याला अनामीकाप्रमाणे बोट धरून मी आहे ना असेच जाणवून देणारा. कधी कणखरपणे स्पष्टवक्तपणा दाखवुन जाणारा. आपल्याला पाहिजे असतो बिनशर्त पाठिंबा. नाही जाणवला तर आपण मनाला लावून घेतो, रागावल्याची भावना घेतो. झुगारून टाकतो तो आश्वासक वावर. विसरतो की मुळात तो होताच आपल्यासाठी.  ते मात्र निष्पापपणे तेथेच. आपल्याच अंगणात. हाक मारायचा अवकाश की नेमकी मदत घेऊन हजर. कसे जमते हे झटणे? स्वतःच्या आयुष्यात काय यांना सगळे ताट मांडून ...